in

OBC Reservation | आरक्षण मिळाले नाही, तर आम्ही निवडणुका होऊ देणार नाही

ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नसेल आणि ओबीसींना योग्य प्रतिनिधीत्व मिळणार नसेल तर आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा हल्लाबोल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे.

पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली. ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. निवडणुका घेण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

जे वंचित, पीडित आहेत, ज्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, त्यांच्यासमोर आज प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहेत. सरकारच्या मानसिकतेबद्दल प्रश्नचिन्ह आहे, आता सरकार अपयशी ठरलं तर सरकारची इच्छा नाही हे स्पष्ट होईल. आम्ही स्वस्थ बसणार नाही, आवाज उठवू. आरक्षण नसेल तर न्यायप्रक्रियेमुळे निवडणुका होणारच नाहीत. त्यामुळे पुढील निवडणुका होण्याआधीच हा ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय घ्या, अशी मागणीही त्यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘वॉक इन’ पद्धतीने लसीकरण सुरु

कोरोनाच्या स्ट्रेनचं WHOकडून नामकरण; भारतातील स्ट्रेन ‘डेल्टा’ आणि ‘कप्पा’