in

…नाही तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही; पंकजा मुंडेंचा विरोधकांना इशारा

औरंगाबाद येथे विभागीय ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय पंकजा मुंडे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकवून दाखवा आणि त्यानुसार निवडणुका घेऊन दाखवा, अशा शब्दात मुंडे यांनी ठाकरे सरकारला ललकारलं आहे. ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय. औरंगाबादेत आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीवर तोफ डागलीय.

जातीवाद पूर्वीही होता, आताही आहे
मी आधीच उपाशी आणि त्यात उपवास, बहुजनांची अवस्थाही अशीच आहे. गोपीनाथ मुंडे म्हणायचे ज्याला जातीची आणि मातीची लाज वाटते त्यांचा काही उपयोग नाही. ज्यांना जातीची आणि मातीची लाज वाटते आशा लोकांना राजकारणात उभं राहण्याची आवश्यकता नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. जातीवाद पूर्वीही होता, जातीवाद आताही आहे. गावामध्ये गेल्यावर जातीवादाच्या भिंती अजूनही दिसतात. संतांच्या महाराष्ट्रात आज ओबीसींची अशी अवस्था का? असा सवालही त्यांनी केलाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मला आजही वाटते मी मुख्यमंत्री आहे , ‘मी पुन्हा येईन‘ ची आशा- देवेंद्र फडणवीस

रस्त्याच्या कामात गैरप्रकार; ईडीच्या पथकांची चौकशी सुरू