in

“हो, तुम्ही सांगायचे मी करायचे, आपला दसरा आपली परंपरा!”

कोविडची दुसरी लाट ओसरू लागल्यावर निर्बंधतात बऱ्याचा प्रमाणात शिथीलता आणण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षानंतर बीडमध्ये भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला भाजप नेत्या पंकजा मुंडे संबोधित करणार आहेत. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. स्वत: खासदार प्रीतम मुंडे यांनी काल या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला.

त्यानंतर पंकजा मुंडे यांनीही एक व्हिडीओ ट्विट करून समर्थकांना भगवानगडावर दसरा मेळाव्यासाठी येण्याचं आवाहन केलं आहे. हो… तुम्ही सांगायचे मी करायचे, आपला दसरा आपली परंपरा!!, असं पंकजा मुंडे या व्हिडीओतून सांगताना दिसत आहेत.

पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओतून त्यांनी समर्थकांना दसरा, दसऱ्याची परंपरा, भगवानगडाचं महत्त्व, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं भगवान गडाशी असलेलं नातं आणि त्यांचं स्वत:चं भगवानगड आणि दसरा मेळाव्याशी असलेलं नातं यावर प्रकाश टाकला आहे. तसेच आपल्या समर्थकांना त्यांनी अत्यंत भावनिक आवाहन करून दसरा मेळाव्याला येण्याचं आवतन दिलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड

Gold and Silver rate today ; जाणून घ्या आजचे सोन्याचांदीचे दर