in

Paralympics Avani Lekhara| नेमबाज अवनी लेखराची ‘कांस्य’कमाई

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) भारताची धमाकेदार सुरुवात सुरूच आहे. अॅथलिट प्रवीण कुमारने (Praveen Kumar) उंच उडीत रौप्य पदक जिंकल्यानंतर भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमधील 50 मीटर राइफल थ्री पोजिशन स्पर्धेत भारताची नेमबाज अवनी लेखरा हिने कांस्यपदक पटकावले आहे.

याआधी अवनी लेखरा हिची टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी पाहायला मिळली होती. आधी 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराला सुवर्ण पदक मिळाले आहे. दरम्यान, अवनी लेखराने क्वॉलिफिकेश राउंडमध्ये सातवे स्थान पटकावले होते. ऑलिम्पिक असो वा पॅरालिम्पिक या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी अवनी ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे. तत्पूर्वी पी.व्ही. सिंधू आणि मीराबाई चानू यांनी ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या गटात रौप्यपदके जिंकली होती. तसेच पॅरालिम्पिकध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची चौथी खेळाडू आहे. (Tokyo Paralympics, R8 Women’s 50m Rifle 3P SH1: Avani Lekhara wins bronze medal)


प्रवीणकुमारने जिंकले रौप्यपदक
भारताचा अॅथलिट प्रवीण कुमारने (Praveen Kumar) देशासाठी आणखी एक रौप्य पदक जिंकले आहे. प्रवीण कुमारने पुरुषांच्या T44 उंच ऊडी स्पर्धेत हा पराक्रम केला. उंच उडीत भारताला मिळालेले हे तिसरे पदक आहे. यापूर्वी निषाद कुमार आणि मरियप्पन यांनी भारतासाठी रौप्य पदके जिंकली होती. प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी टी 64 स्पर्धेत 2.07 मीटरची नोंद केली. हा आशियाई विक्रम ठरला आहे. ब्रिटनच्या जोनाथन ब्रूम-एडवर्ड्सने 2.10 मीटरसह सुवर्ण, तर पोलंडच्या मॅसिज लेपियाटोने 2.04 मीटरसह कांस्य पदक जिंकले.

हे ही वाचा
Tokyo Paralympics | आशियाई विक्रमासहीत प्रवीण कुमारला रौप्यपदक

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Wall collapse | भिवंडीत एक मजली घर कोसळून एकाचा मृत्यू, तीन जखमी

Teacher Recruitment; शिक्षक भरती संदर्भात शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा