in

परमबीर सिंह यांच्याशी लागेबांधे असणारे सर्वच अडचणीत; अँटी करप्शनला चौकशीचे आदेश

सुरेश काटे | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ठाणे शहर पोलीस आयुक्त असताना केलेल्या भष्ट्राचाराबाबत पोलखोल करुन सर्वांना हादरवुन सोडणा-या पी.आय.घाडगेंच्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. घाडगे यांनी केलेल्या आरोपांच्या अनुंषगाने अन्टी करप्शन विभागाने उघड चौकशी करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत.त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील विविध बिल्डर, भुमाफ़ीया, रेती माफ़ीया तसेच पोलीस अधिका-यांसह राजकीय व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत.

घाडगें यांनी परमवीर सिंग ५०० कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार करण्यात आल्याची तक्रार पोलीस तसेच शासनाकडे केलेली होती. त्यांच्या तक्रारीतील २४ आरोपांच्या अनुंषगाने अँटी करप्शन ब्युरोला उघड चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. परमवीर सिंगावरील आरोपामधील ते प्रत्येक डीसीपीकडुन दिवाळीत ४० तोळे सोने घेत होते, तसेच इतर पोलीस अधिका-यांनकडुन सोने घेणे, पोलीस स्टेशन इनचार्ज पद देताना पैसे स्विकारणे, मिरा रोड कॅाल सेंटर केसमधील आरोपींची नावे काढणे, सोलापुर ड्रग्ज केसमध्ये आरोपींची नावे काढणे, गर्भश्रीमंत आरोपीची नावे काढण्यासाठी पेसे घेणे, बिल्डरांची सेटलमेंट, कल्याण-डोंबिवलीतील टिडीआर घोटाळा, सलील चर्तुवेदी ड्रग्ज केस, तेलगीच्या बनावट स्टम्प छापखान्याला अभय असे एकुण मिळुन २४ आरोप करण्यात आलेले होते.

गुन्हा नोंदविल्यानंतर पी.आय. घाडगे यानी मारलेला हा दुसरा स्ट्रोक निशाण्यावर लागल्यामुळे त्यांच्याशी लागेबांधे असणारे सर्वांच्याच मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलर्सच दुकान लूटले; घटना सीसीटीव्हीत कैद

‘विरोधी पक्ष असताना मनोरंजनासाठी सिनेमा-नाट्यगृहांची गरज आहे का?’