in

‘परमबीर यांच्या जिवाला मुंबई पोलिसांकडून धोका, ते भारतातच’; वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात दावा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे गंभीर आरोप केल्यानंतर परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आलं होतं. मात्र, परमबीर यांच्या जिवाला मुंबई पोलिसांकडून धोका आहे. ते कुठेही पळून गेले नसून भारतातच आहेत, असा दावा परमबीर यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह देशातच आहेत. पोलिसांकडून परमबीर यांच्या जीवाला धोका आहे. परमबीर यांची CBI च्या कुठल्याही कार्यालयात उपस्थित राहण्याची तयारी आहे. ४८ तासांच्या आत आपण सीबीआयसमोर हजर होण्यास तयार आहोत, असंही परमबीर यांच्या वतीनं त्यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.

परमबीर यांना संरक्षण –

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं परमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. तसंच परमबीर यांनी संपूर्ण चौकशीत सहभाग घेऊन सहकार्य करावं, असं निर्देशही सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अभिनंदन वर्धमान यांना ‘वीरचक्र’ पुरस्कारने सन्मानित

बिग बॉस मराठीच्या घराला मिळाले टॉप १० सदस्य; ‘ही’ स्पर्धक बाहेर!