in

पीकविम्यासाठी परभणीत भाजपा आक्रमक

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांमध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे. राज्यभरात पीकविम्याचे पैसे थकल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. भाजपाने देखील याला पाठिंबा देत आत्मक्लेश आंदोलन पुकारलं आहे.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगपती अनिल अंबानींच्या प्रतिकृतीसमोर घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या थकीत पीक विमा प्रकरणी परभणीत भाजप आज चांगली आक्रमक झाल्याचा पाहायला मिळालं. थकलेल्या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केलं.

यावेळी भाजप कार्यकर्त्यां बरोबर शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल अंबानींच्या प्रकुर्ती समोर कपडे काढून आंदोलन केले , यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शेतकरी आणि भाजपा कार्यकर्त्यांनी राज्य सरकार आणि रिलायन्स इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पीक विम्याचा परतावा तात्काळ देण्याची मागणी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“लवकरच सत्तांतर… मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांशी भेट राजकीय तडजोडीसाठीच”

दापोलीत चक्क रानगव्याचे दर्शन