in

विद्यार्थिनीची छेडछाड; मुंबईच्या एनसीबी अधिकार्‍याला परळी रेल्वे पोलीसांकडून अटक

बीड : विकास माने | हैद्राबाद -हडपसर रेल्वेगाडीमध्ये उदगीर-लातूर रोड दरम्यान एका विद्यार्थिनीची छेडछाड करण्यात आली. हा प्रकार गुरुवारी रात्री घडला असून याप्रकरणी विद्यार्थिनीने एका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

छेडछाड करणारा व्यक्ती हा एनसीबीचा (अंमली पदार्थ नियंत्रण विभाग) मुंबई येथील अधिकारी आहे. एनसीबीचा अधीक्षक असलेल्या दिनेश अंकुश चव्हाण या अधिकार्‍याला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी आरोपीविरुद्ध परळी येथील जीआरपी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 354, 509 अन्वये गुन्हा दाखल करण्याची आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, गुरुवारी रात्री हैदराबाद- हडपसर या रेल्वेने एनसीबीचा एक अधिकारी व एक विद्यार्थिनी प्रवास करीत असताना त्या अधिकार्‍याने विद्यार्थिनीची छेड काढली.त्यानुसार विद्यार्थिनीने रेल्वे पोलिसाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आरोपीस परळी रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले.हा प्रकार लातूर रोड दरम्यान घडला आहे. अटक करण्यात आलेल्या दिनेश चव्हाण यास औरंगाबाद येथे न्यायालयात हजर करण्यात येईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Chippi Airport | मुख्यमंत्र्यांचा पाहुण्यांसारखा म्हावऱ्याचा पाहुणाचार करु,पण चिपीचं श्रेय आमचंच; नारायण राणे

साताऱ्यात खूनाच्या प्रकरणातील आरोपीला 3 तासांत केले गजाआड