in

दोन्ही सभागृहांमध्ये कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक मंजूर

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीविषयक कायदे परत करण्याबाबत दिलेले आश्वासन पूर्ण झाले आहे. लोकसभेनंतर आता राज्यसभेतूनही कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक मंजूर झाले आहे. विरोधकांच्या गदारोळात हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने कायदे मागे घेण्याची औपचारिकता पूर्ण होणार आहे.

केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी मांडल्यानंतर लोकसभेने शेती कायदे रद्द करण्याचे विधेयक कोणत्याही चर्चेविना मंजूर केले. लोकसभेने कोणतीही चर्चा न करता शेत कायदे निरसन विधेयक, २०२१ मंजूर केले. यानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या विधेयकावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली होती.

लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांचा गदारोळ पुन्हा सुरू झाला होता. या गदारोळात कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी कायदा निरसन विधेयक मांडले होते. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना हे कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. त्याचे फायदे कुठेतरी शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आपण यशस्वी होऊ शकलो नाही, असे ते म्हणाले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अन् पंकजा मुंडे बीडमध्ये अचानक पोहोचल्या पान स्टाॅलवर..!

Omicron Corona | क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर; नव्या व्हेरियंटचा मुंबईच्या टेस्ट मॅचवर परिणाम होणार नाही