in

आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत

सोमवारपासून म्हणजे आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter session of Parliament) सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत वातावरण तापण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतही (All Party Meeting) तणावाचे वातावरण होते. आम आदमी पक्षाने (AAP) बैठकीतून वॉकआउट केलं तर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बैठकीला उपस्थित न राहिल्याबद्दल टीका केली.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या एमएसपी आणि वीज बिलावर चर्चा होऊ शकते. यासोबतच विरोधक कोविड-१९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचा मुद्दाही उपस्थित करू शकतात. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी एकजुटीने सरकारला घेरण्याचा डाव आखला असल्याची राजकीय चर्चा आहे. इतकंच नाहीतर, सीमेवर चीनची आक्रमकता आणि पेट्रोल-डिझेलसह इंधनाच्या वाढत्या किमतींवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

द. आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोनाबाधित

राज्यात पुन्हा निर्बंध? राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक