in

टीआरपी घोटाळा प्रकरण : पार्थो दासगुप्ता यांना जामीन मंजूर

टीआरपी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच दासगुप्ता यांना पुढील ६ महिने दर महिन्यातील पहिल्या शनिवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला हजेरी द्यावी लागणार आहे.

मुंबई पोलिसांनी बहुचर्चित टीआरपी घोटाळा उघडकीस आणला होता. याप्रकरणी आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयानं ही याचिका अनेकदा फेटाळली. यातील १४ जणांना जामीन मंजूर झाला आहे. जामीन नाकारल्यामुळे दासगुप्ता यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणात पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यातील कथित संभाषण लीक झाले होते. टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी गोस्वामी यांनी दासगुप्ता यांना ४० लाख रुपये टप्पाटप्प्याने दिले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आयसीएसई बोर्डाचे दहावी, बारावीच्या परी‌क्षांचे वेळापत्रक जाहीर

क्रिकेटर हरभजन सिंहच्या ‘फ्रेंडशिप’ चित्रपटाचे टीझर लाँच