in

साताऱ्याच्या खंबाटकी घाटात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह

प्रशांत जगताप | सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढल्याची घटना घडली आहे. स्त्री जातीचा मृतदेह आहे. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी महिलेचा खून करुन जाळल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेचा खंडाळा पोलिस तपास करीत आहेत.

खंबाटकी घाटाच्या पहिल्या वळणावरून जाताना एका वाटसरूंला डाव्या बाजूच्या नाल्यात मृतदेह टाकल्याचे दिसून आले. या संबधित माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलीस निरिक्षक महेश इंगळे, उपनिरिक्षक स्वाती पवार व पोलीस पथक घटनास्थळी पोहचत तापसणी केली असता, मृतदेहाच्या तपासात पायातील पैंजण व जोडवी यावरून साधारणपणे २० ते २५ वर्ष वयाच्या महिलेचा मृतदेह असल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या अंधारात हा मृतदेह घाटात टाकला गेल्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रक्नी आता पोलीस अधिक तपास करीत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झडती; दोन पीएसआयसह पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन

SEBC प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय