in

परभणीत 11 जिल्ह्यातील प्रवाशांना बंदी

राज्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आता सर्वच जिल्ह्यातील प्रशासनाने कठोर पवित्रा घेत कठोर नियमावली आखण्यास सुरुवात केली आहे.त्यानुसार काही जिल्ह्यात संचारबंदी, लॉकडाऊन जाहीर केले, मात्र आता परभणी जिल्यात तर थेट प्रवेशबंदीच करण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यामध्ये विदर्भातील तब्बल 11 जिल्ह्यातील प्रवाशांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच या 11 जिल्ह्यात बसेस तसेच खासगी वाहनाने जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, भंडारा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांतून परभणी जिल्ह्यात येणाऱ्या तसेच, परभणी जिल्ह्यातून विदर्भातील नमुद 11 जिल्ह्यात जाणाऱ्या खासगी आणि सार्वजनिक प्रवासी वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबतची माहिती परभणीचे जिल्हादंडाधिकारी दी. म. मुगळीकर यांनी दिली आहे. त्यानंतर अकोला जिल्हा प्रशासनाकडूनही परभणीत जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. पूर्व परवानगी घेतल्यास अत्यावशक सेवेसाठी सूट देण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वाशिममध्ये 229 विद्यार्थ्यांना कोरोना, 4 कर्मचाऱ्यांनाही लागण

दोन मित्रांच्या मैत्रीची अनोखी कथा, ‘रूप नगर के चीते’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!