in

प्रवाशांना आपत्कालिन स्थितीची तात्काळ माहिती मिळणार!

रेल्वे रुळाला तडे, सिग्नल यंत्रणेत बिघाड असा अनेक कारणामुळे लोकल विस्कळीत होत असते. मात्र आता लोकलमध्ये काही बिघाड व पुढील वेळापत्रकाची अचूक माहिती प्रवाशांना मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मोटरमन, गार्डच्या के बिनमध्ये ‘मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिके शन’ यंत्रणा बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा रेल्वे नियंत्रण कक्षासह प्रत्येक महत्त्वाच्या विभागाशी जोडण्यात आली आहे. परिणामी या विभागांशी संपर्क साधून माहिती घेणे मोटरमन व गार्डना शक्य होणार आहे. या यंत्रणेचे उद्घाटन सोमवारी पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक अलोक कन्सल यांच्या हस्ते करण्यात आले.

लोकल चालवताना मोबाइलवर बोलण्यास मोटरमनला मनाई आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास फक्त गार्डकडून याची कल्पना प्रथम जवळच्या स्थानकातील स्टेशन मास्तर, रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली जाते. त्यामुळे लोकल का थांबली याचे कारण तात्काळ गार्डकडे व्हॉकीटॉकीद्वारे संपर्क साधून विचारले जाते, तर रेल्वे व्यवस्थापन कक्षात असलेल्या मोठय़ा स्क्रीनवर लोकलची सद्यस्थिती समजते. परंतु सक्षम अशी यंत्रणा नसल्याने मोठे अडथळे येतात. त्यामुळेच मोटरमन, गार्ड व नियंत्रण व व्यवस्थापन कक्षात सुसंवाद राहावा आणि अचूक माहिती मिळावी. तसेच प्रवाशांनाही त्याद्वारे वेळेत माहिती पोहोचावी म्हणून मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन सिस्टिम बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

गार्ड आणि मोटरमनच्या के बिनमध्ये ही यंत्रणा कार्यरत राहणार असून ती नियंत्रण कक्षाशी जोडलेली असेल. एखादा तांत्रिक बिघाड झाल्यास मोटरमनदेखील गार्डबरोबर लोकलच्या विभाग नियंत्रकाशी संपर्क साधू शकतो. शिवाय नियंत्रण कक्ष, रेल्वे पोलिसांशीही संपर्क साधता येईल. एखाद्या घटनेच्या माहितीची देवाणघेवाण के ल्यावर प्रवाशांनाही अवघ्या काही मिनिटांत अचूक माहिती मोटरमन, गार्डकडून उद्घोषणेमार्फत देण्यात येईल, अशी माहिती कन्सल यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“अजित पवार मराठवाडा-विदर्भाच्या दौऱ्यावर आल्यावर दगड मारून स्वागत करायला पाहिजे” – निलेश राणे

Maharashtra budget session 2021 LIVE | वाढीव वीज बिल मुद्यावर चर्चा घ्या, देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत मागणी