अमेरिकेची आंतराळ संशोधन संस्था नासाने नवा विक्रम केला आहे. नासाचं रोव्हर परसिव्हरन्स अखेर मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरलं आहे. या रोव्हरचा उद्देश मंगळावरील जीवनाच्या शक्यता तपासणं हा आहे. नासाचं हे रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर उतरुन काही नमुने गोळा करेल. कॅलिफोर्नियातील अंतराळ संस्थेच्या जेट प्रोपल्शन लॅबमधील संशोधकांना या मिशनमध्ये महत्त्वाची माहिती हाती लागेल अशी आशा आहे.
मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात होती की नाही?याचा शोध घेण्यासाठी हाती घेतलेल्या मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. १८ फेब्रुवारी रोजी पहाटे २.३० वाजता नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरचं मंगळावर यशस्वी लँडिंग करण्यात आलं. जेजेरो क्रेटर (Jezero Crater) या मंगळावरील दुर्गम भागात हे रोव्हर उतरवण्यात आलं आहे.
मंगळावरील जीवसृष्टीच्या पाऊलखूणा शोधण्यासाठी पृथ्वीवरील पाठवण्यात आलेल्या पर्सिव्हरन्स रोव्हरनं यशस्वीपणे पाऊल टाकलं. नासाने सात महिन्यांपूर्वी मंगळावर पर्सिव्हरन्स रोव्हर पाठवला होता. १८ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजता रोव्हरचं यशस्वीपणे लँडिंग करण्यात आलं. या रोव्हरच्या लँडिंगबरोबरच अमेरिका मंगळावर सर्वाधिक रोव्हर पाठवणारा पहिला देश ठरला आहे.
Comments
Loading…