in

पेट्रोल डिझेलच्या किंमती धर्मसंकट; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल तसेच डिझेलचे दर प्रति लिटर १०० रुपयांनजीक पोहोचले आहेत. तसेच अनुदानित, विना अनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीही वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती तुलनेत कमी असूनही देशांतर्गत प्रमुख इंधनाचे दर मात्र दिवसागणित वाढत आहेत.

अशातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी एका कार्यक्रमामध्ये इंधन दरवाढीसंदर्भात एक भाष्य केलं आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती कधी कमी होतील हे आपल्याला सांगता येणार नाही असं सीतारामन यांनी म्हटलं आहे. तसेच पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती या धर्मसंकट असल्याचेही निर्माला यांनी म्हटलं आहे.

“यावर केवळ उपकर आकारला जातो असं नाही. केंद्राकडून आकरले जाणारे उत्पादन शुल्क तसेच राज्यांकडून आकारला जाणारा व्हॅटही यामध्ये असतो. त्यामुळे यामधून महसूल मिळतो हे काही लपवण्यासारखी गोष्ट नाही. केवळ मलाच नाही तुम्ही कोणत्याही राज्याला विचारलं तरी यात महसूल आहे असं ते सांगतील,” असंही निर्मला यांनी म्हटलं.

या इंधन दरवाढीवर मार्ग काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांनी चर्चा करावी हा आहे, असंही निर्मला यांनी म्हटलं. “यासंदर्भात काहीतरी करणं गरजेचे आहे हे मला मान्य आहे. आम्हाला काय करणं शक्य आहे पाहुयात,” असंही निर्मला यांनी ग्राहकांना अधिक पैसे द्यावे लागू नयेत असं मत मांडताना म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

केरळमध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशनवर स्फोटकं जप्त; एका महिलेला अटक!

‘ये तो सिर्फ ट्रेलर है’; अंबानींना धमकीच्या पत्राने खळबळ