पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चांगलीच झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. याचाच सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होत आहे. काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल दर 97.57 रुपयांवर पोहोचलं आहे, तर डिझेलचे दर 88.60 रुपये झाले आहे.शनिवारी सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात 15 ते 16 पैशांची वाढ केली आहे, तर पेट्रोलच्या किंमती 24 ते 25 पैशांनी वाढल्या आहेतदिल्लीत पेट्रोलची किंमत 91.17 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 81.47 रुपये झाली आहे. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोलची किंमत 97.57 रुपये तर डिझेलची किंमत प्रति लिटर 88.60 रुपयांवर पोचली आहे.
देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर –
मुंबई – 97.47 रुपये प्रतिलिटर
नवी दिल्ली – 91.17 रुपये प्रतिलिटर
कोलकाता – 91.35 रुपये प्रतिलिटर
चेन्नई – 93.12 रुपये प्रतिलिटर
नोएडा – 89.38 रुपये प्रतिलिटर
देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव
मुंबई – 88.60 रुपये प्रतिलिटर
नवी दिल्ली – 81.47 रुपये प्रतिलिटर
कोलकाता – 84.35 रुपये प्रतिलिटर
चेन्नई – 86.45 रुपये प्रतिलिटर
नोएडा – 81.91 रुपये प्रतिलिटर
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.
Comments
Loading…