in

आयर्नमॅन किताब विजेत्या खेळाडूच्या घरावर पेट्रोल बाॅम्ब हल्ला!

संदीप गायकवाड | आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध किताब जिंकून भारताने नाव उंचावणाऱ्या आयर्नमॅन हार्दिक पाटील यांच्या घरावर पेट्रोल बाॅम्ब हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. तसेच हा हल्ला नेमका कोणी केला आहे, तसेच या हल्ल्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

विरार पश्चिमेच्या वर्तक वाॅर्ड स्वागत बंगलोवर ४ मे च्या रात्री ११.४३ ते ११.५० दरम्यान पेट्रोल बॉम्ब हल्ला करण्यात आला. हिरव्या रंगाच्या यामाहा फसीनो स्कूटरवरून येऊन, पेट्रोल भरलेल्या काचेच्या बाॅटलमधील कोंबलेल्या कपड्यास आग लावून ती पेटती बाॅटल हार्दिक पाटील यांच्या राहत्या बंगल्यामधील गेटच्या आतील भागात फेकून हा हल्ला करण्यात आला. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र घराबाहेरील गवत व झाडे यांना आग लागून नुकसान झालं आहे. या घटनेदरम्यान आयर्नमॅन हार्दिक पाटील घरात उपस्थित नव्हते. मात्र इतर सर्व कुटुंबीय घरामध्येच होते.ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे.

हार्दिक पाटील यांनी विरार पोलिस ठाणे येथे घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार देऊन गुन्हा नोंद केलेला आहे. हार्दिक पाटील हे गेल्या काही दिवसांपासून अत्यंत मानसिक तणावात असून, काही वैयक्तिक समस्यांनी त्रस्त असल्याबाबतची माहिती मिळत आहे.तसेच त्यांना काही व्यक्तींमार्फत सतत फोनमार्फत धमक्या येत असून त्यांच्या जीवास धोका असल्याबाबतची तक्रार देखील त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये नोंदविली आहे.विरार पोलीस या सर्व घटनेचा सखोल तपस करीत आहेत.

आयर्नमॅन स्पर्धेसाठी भारतीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये हार्दिक पाटील यांची नोंद आहे. हार्दिक पाटील हे आंतरराष्ट्रीय पातळीचे भारतीय खेळाडू असून ते आयर्नमॅन पुरस्कार प्राप्त खेळाडू आहेत. आतापर्यंत १० पूर्ण तसेच १६ अर्ध आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केलेले ते पहिले भारतीय खेळाडू आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यांना लस देनं जमेना, डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशात लसीकरण कसे होणार ? ममतांचा मोदी सरकारला टोला

Maratha Reservation; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मराठा आरक्षणासंदर्भातली बैठक संपली…