in

Petrol diesel rate | पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होत होताना भारतात मात्र पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहेत. देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत शुक्रवारी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. इंडियन ऑईल कोर्पोरेशनच्या माहिती नुसार, शुक्रवारी पेट्रोलच्या किंमतीत २७ पैसे तर डिझेलच्या किंमतीत २८ पैशांची वाढ झाली आहे.

मागील आठवड्यात जगभरातील वाढलेल्या लसीकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या मागणीत वाढ होईल असं चित्र दिसत होतं. पण या आठवड्यात पुन्हा लसीकरणाचा वेग मंदावला आणि कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या.

दिल्लीत आज पेट्रोल ९४.७६ रुपये लिटरवर पोहचले आहे तर डिझेलची किंमत ८५.६६ रुपये लिटरवर पोहोचली आहे. मुंबईत पेट्रोल १००.८८ रुपये लिटर आणि डिझेल ९२.९९ रूपये लिटर पर्यंत पोहोचले आहे. मुंबईत पेट्रोलने शंभरी पार केली आहे.

महिन्याभरात, 2 मे पासून आतापर्यंत पेट्रोलची किंमत 4.36 रुपयांनी वाढली आहे आणि डिझेलची किंमत 4.93 रुपयांनी वाढली आहे. मागील वर्षभरात पेट्रोलच्या किंमतीत 11 रुपयांची वाढ झाली असून डिझेल 12 रुपयांनी महाग झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sushant Singh Rajput Case| सिद्धार्थ पिठानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Maratha Reservation; ”ताकद योग्य वेळी दाखवूच”; संभाजीराजेंचा सूचक इशारा!