in

Petrol Diesel Price | पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल, वाचा आजचे दर

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आजही देशातल्या अनेक भागांमध्ये शंभरच्या पार इंधन पोहोचलं आहे. आज पेट्रोल डिझेलच्या दरात 34 पैशांपेक्षा वाढलं आहे.

दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलचे दरांनी कहर केला आहे. गुरुवारी दिल्लीतल्या अनेक शहरांमध्ये 30 ते 35 पैशांनी इंधनामध्ये वाढ झाली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, गुरुवारी कोलकातामध्ये पेट्रोल 91.11 लिटर भाव आहे. डिझेलबद्दल बोलायचं झालं तर आज दिल्लीत डिझेल 80.27 रुपये प्रति लिटर दराने विकलं जात असून मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर 87.31 तर कोलकातामध्ये डिझेलचा दर प्रति लिटर 83.86 रुपये आहे.

पाहा तुमच्या शहरांमधील पेट्रोलचे दर

  • नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 89.88 रुपये प्रति लिटर
  • मुंबई (Mumbai Petrol Price Today): 96.32 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 91.11 रुपये प्रति लिटर
  • पुणे (Pune Petrol Price Today) : 95.95 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

  • नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 80.27 रुपये प्रति लिटर
  • मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 87.32 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 83.86 रुपये प्रति लिटर
  • पुणे (Pune Diesel Price Today) : 85.63 रुपये प्रति लिटर

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यपाल विरुद्ध सरकारमध्ये पुन्हा ‘सामना’ रंगणार ? कारण नाना पटोले…

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आणखी किती वर्षे टोलवसुली चालणार?; हायकोर्टाचा सरकारला सवाल