in

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेल शंभरी पार

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. आज पेट्रोल डिझेलचे दर 29-38 पैशांनी वाढले आहेत. या वाढीनंतर आज देशातील अनेक शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर आहेत. परिणामी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीनी सर्वसामान्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

सरकारी तेल कंपन्या गेल्या एका आठवड्यात इंधनाच्या किमतीत सातत्याने वाढ करीत आहेत. आजच्या वाढीनंतर इंधनाचे दर देशातील सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ शहरात एक्सपी पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे, तर अनेक शहरांमध्ये ती प्रतिलिटर 100 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. येथे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्स कमी करण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात त्यांचे दर खाली येण्याची शक्यता नाही.

मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये एक्सपी पेट्रोलचे भाव प्रति लीटल 100 रुपयांच्या पलीकडे आहेत. महाराष्ट्रातीलही अनेक शहरात पेट्रोलचे दर शंभरीच्या जवळ पोहोचले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 95.75 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचे दर 86.72 रुपये प्रति लीटर आहेत. त्यामुळे सामान्य मुंबईकरांसाठी इंधनाचे भाव आवाक्याबाहेरील आहेत. नागपूर, कोल्हापूर नाशिक, पुणे या महत्त्वाच्या शहरातही इंधनाचे भाव चढेच आहेत.

  • दिल्लीत पेट्रोल 89.29 रुपये तर डिझेल प्रति लिटर 79.70 रुपये आहे.
  • मुंबईत पेट्रोल 95.75 रुपये तर डिझेल प्रति लिटर 86.72 रुपये आहे.
  • कोलकातामध्ये पेट्रोल 90.54 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 83.29 रुपये आहे.
  • चेन्नईमध्ये पेट्रोल 91.45 रुपये तर डिझेल 84.77 रुपये प्रति लिटर आहे.
  • बेंगळुरूमध्ये पेट्रोल 92.88 रुपये आणि डिझेल 84.49 रुपये प्रति लिटर आहे.
  • भोपाळमध्ये पेट्रोल 97.27 आणि डिझेल 87.88 रुपये प्रतिलिटर आहे.
  • नोएडामध्ये पेट्रोल 87.93 रुपये तर डिझेल 80.13 रुपये प्रतिलिटर आहे.
  • चंडीगडमध्ये पेट्रोल 85.93 रुपये तर डिझेल 79.40 रुपये प्रतिलिटर आहे.

पेट्रोल डिझेलचे दर याप्रमाणे तपासा
आता आपण एसएमएसद्वारे देखल पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले जातात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला RSP सह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाइटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपण BPCL कस्टमर असाल तर RSP लिहून 9223112222 वर आणि एचपीसीएल कस्टमर HPPrice असे लिहून 9222201122 एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नाझींनी जे जर्मनीमध्ये केले, तेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतोय; राम मंदिर देणगीवरून कुमारस्वामींची टीका

बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का; पंकज देशमुख करणार सेनेत प्रवेश?