लोकशाही न्यूज नेटवर्क
पेट्रोलियम कंपन्यांनी केलेल्या इंधनवाढीमुळे महागाईचा भडका उडण्याची लक्षण दिसत आहेत. आज सलग सातव्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढ केलीय. काही शहरात पेट्रोल दराने शतक पूर्ण केलं आहे. परभणीत १ लिटर पेट्रोल आता १०० रुपयांना झालं आहे. या इंधन दरवाढीवरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका होत आहे.
देशभरात पेट्रोल २९ पैसे तर डिझेल ३२ पैशानी दर वाढवले. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव ९५.४६ रुपये झाला आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८६.३४ रुपये मोजावे लागतील. तर राज्यातील परभणीमध्ये पॉवर पेट्रोलचा भाव १००.१६ रुपये झाला आहे. तर साध पेट्रोल सर्वाधिक ९७.४५ रुपये आहे. परभणीत १ लिटर डिझेलचा भाव ८६.९५ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ८८.९९ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ७९.३५ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९१.१९ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८४.४४ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९०.२५ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८२.९४ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९१.९७ रुपये असून डिझेल ८४.१२ रुपये झाला आहे.
या संदर्भात स्पष्टीकरण देताना “तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय किंमतींवर अवलंबून असते यामध्ये केंद्र सरकारची कोणतीच भूमिका नाही” असे मत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माध्यमांना दिले आहे.
Comments
Loading…