in

Petrol Diesel Price | पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

लोकशाही न्यूज नेटवर्क

देशात सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आत्तापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे. मंगळवारपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार शनिवारी आज दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर 88.44 रुपये आहे, तर मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 94.93 रुपयांवर पोहोचलं आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 89.73 रुपये तर चेन्नईमध्ये प्रति लिटर 90.70 रुपये आहे. त्याचबरोबर, डिझेलचे दर दिल्लीत आज 78.74 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर 85.70 रुपये आहे, कोलकातामध्ये डिझेलचा दर प्रतिलिटर 82.33 ​​रुपये, चेन्नईमध्ये डिझेलचा दर 83..86 रुपये आहे.

देशातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर

शहर पेट्रोल डिझेल
मुंबई 94.93 रुपये 81.96 रुपये
नवी दिल्ली 88.44 रुपये 78.38 रुपये
कोलकाता 89.73 रुपये 81.96 रुपये
चेन्नई 90.70 रुपये 83.52 रुपये
बंगळुरू 91.40 रुपये 83.47 रुपये
हैदराबाद 91.96 रुपये 85.89 रुपये
पटना 90.84 रुपये 83.95 रुपये
जयपूर 94.86 रुपये 87.04 रुपये
लखनौ 87.22 रुपये 79.11 रुपये

मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 95 रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतीत आणखी वाढ झाल्यास पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. मात्र कच्च्या तेलाची किंमत पुन्हा कमी होऊ लागली आहे, ज्यामुळे इंधनांच्या किंमतीतही घसरण होण्याची अंदाज वर्तवला जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Railway Megablock | उद्या ‘या’ वेळेत धावतील लोकल

Ahilyadevi Holkar | ‘होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा’