लोकशाही न्यूज नेटवर्क
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चांगलीच झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. याचाच सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होत आहे. आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. चार दिवसात पेट्रोल ८० पैशांनी तर डिझेलमध्ये तब्बल १ रुपया ३० पैशांनी वाढ झाली आहे.
मुंबईत पेट्रोल ९५ रुपयांजवळ पोहोचले असून, राजधानी दिल्लीत पेट्रोल दर सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.सलग चौथ्या दिवशी लीटरमागे पेट्रोल दरात २९ पैसे आणि डिझेल दरात ३८ पैसे वाढ करण्यात आली आहे.आज मुंबईत लीटरमागे पेट्रोलचा दर ९४.६४ रुपये झाला आहे. तर एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८५.३२ रुपये मोजावे लागणार आहेत.
दिल्लीत पेट्रोलने सर्वोच्च पातळी गाठली असून, लीटरचा दर ८८.१४ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ७८.३८ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९०.४४ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८३.५२ रुपये भाव आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर ८९.४४ रुपये झाले आहे. डिझेलचा दर ८१.९६ रुपये झाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून होणाऱ्या दरवाढीवर केंद्र सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे. तसेच सरकार हस्तक्षेप करत नसल्यामळे सामान्य नागरिकांमध्येही संतापाची लाट असल्याचे पाहायला मिळत आहे.
आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMSच्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.
Comments
Loading…