in

मुंबईत पेट्रोलची वाटचाल शतकाकडे; वाचा आजचे दर

कोरोनामुळे आधीच आर्थिक अडचणी सापडलेले असताना आता वाढत्या इंधनाच्या दरामुळे आणखी पैशांची चणचण भासणार आहे. राज्यात गेल्या दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. अशात आज मुंबईत पेट्रोलची वाटचाल शतकाकडे चालली आहे. आज मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 97.34 रुपये आहे तर डिझेलचा दर प्रति लिटर 88.44 पैसे इतका आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशातल्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पार गेल्या आहेत. गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनेक पटींनी वाढ झाली. दररोज 30 पैशांपर्यंत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली पण बुधवारी आणि आज गुरुवारीही दरांमध्ये फारसे बदल झालेले दिसले नाहीत.

प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

  • नवी दिल्ली : 90.93 रुपये प्रति लिटर
  • मुंबई : 97.34 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता : 91.1 2रुपये प्रति लिटर
  • चेन्नई : 92. 90 रुपये प्रति लिटर
  • नोएडा : 89.19 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

  • नवी दिल्ली : 81.32 रुपये प्रति लिटर
  • मुंबई : 88.44 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता : 84.20 रुपये प्रति लिटर
  • चेन्नई : 86.31 रुपये प्रति लिटर

नोएडा : 81.76 रुपये प्रति लिटर

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पालघर साधू हत्याकांड : नवे आरोपपत्र सादर करण्याचे आदेश

टि्वटरवर ट्रेण्ड होतंय ‘मोदी जॉब दो’