in

Petrol Price Today : देशातलं सर्वात महाग पेट्रोल मिळतय महाराष्ट्रात, परभणीत पेट्रोलचा दर 95 रुपयांकडे!

लोकशाही न्यूज नेटवर्क

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चांगलीच झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. याचाच सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनांच्या दरांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. देशातलं सगळ्यात महाग पेट्रोल हे महाराष्ट्रात असून राज्यात परभणी जिल्ह्यात सर्वाधिक महाग पेट्रोल मिळत आहे.

परभणीत आज पेट्रोलचा दर हा प्रति लीटर 94.65 रुपये आहे. शनिवारी नांदेडमध्ये प्रति लीटर पेट्रोलचा भाव 94.33 रुपये इतका होता. तर परभणीमध्येही प्रति लीटर पेट्रोलता भाव 94.12 रुपयांवर होता. यासोबतच आज जालन्यात 93.84 रुपये असून उस्मानाबादमध्ये 93.30 प्रति लीटर भाव आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?

तुम्ही मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकता. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“RSS महिलांचा सन्मान करत नाही; ही फॅसिस्ट, पुरुषवादी संघटना”, – राहुल गांधी

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करू शकतो, मात्र…; मध्य रेल्वेनं दिली ‘ही माहिती