in

इंधन दरवाढी संदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचा अजब तर्क

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशातील काही शहरांमध्ये तर पेट्रोलचे दर १०० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहेत. या संदर्भात आता पेट्रोलियच्या वाढत्या दरांसाठी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अजब कारण दिले आहे. हिवाळ्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत होत्या. मात्र आता हिवाळा संपत आल्याने इंधनाची मागणी कमी होऊन पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होतील, असा दावा त्यांनी केला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलियमच्या उत्पादनामुळे ग्राहकांवर परिणाम होत आहे. आता थंडी कमी होत आहे. त्यामुळे पेट्रोलियमच्या किमतीही कमी होतील. पेट्रोलियमच्या किमती हा एक आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे. थंडीमध्ये मागणी वाढल्यामुळे किमतींमध्ये वाढ झाली आहे. मात्र आता किमती कमी होतील. असे अजब विधान केंद्रीय मंत्र्यांनी केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारताच्या ‘या’ तडाखेबाज फलंदाजाने घेतली निवृत्ती

मराठीच्या मुद्द्यावरून ‘मनसे’चे पुण्यात ‘खळखट्याक’ आंदोलन