गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपला फोन टॅप केला जात असल्याचा दावा केला आहे. यापूर्वीही अनेकदा फोन टॅपिंगबाबत चर्चा होत असते. मात्र, आव्हाड यांच्या टि्वटनंतर आता पुन्हा एकदा या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आपला फोन टॅप होतोय असं वाटत असल्याचं म्हटलं आहे.
‘माझा फोन टॅप होत असल्याचा मला संशय येत आहे. विशेषत: माझ्या व्हॉट्सअॅप कोणत्यातरी संस्थेकडून निगराणी ठेवली जात आहे’, अशा आशयाचं टि्वट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
संजय राऊत यांनीदेखील यापूर्वी फोन टॅप होत असल्याचा दावा केला होता. यानंतर या मुद्यावर बरीच चर्चा झाली होती. भाजप सरकारच्या काळात झालेल्या फोन टॅपिंगची चौकशी करण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आले होते.
Comments
Loading…