in , ,

ठाकरे उड्डाणपुलावर खड्डेच- खड्डे; नागरिकांचा जिव धोक्यात

गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावरील खड्डे आणि दुर्घटना हि मालिका सुरुच आहे. आता चंद्रपुर शहरातील मुख्य मार्गावरील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुल खड्डेमय झाल्याने वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होत आहे. खुप दिवसापासुन मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डांमध्येही पाणी साचले आहे.

परिणामी, नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. नागपूरहुन हैद्राबाद कडे जाणाऱ्या मार्गावरील चंद्रपूर शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुल आहे. या खाड्यामुळे पुलावर आजवर अनेक अपघात झाले आहेत. तरीसध्दा प्रशासन याकडे लक्ष देत नाही. या खड्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून हे पुल खड्डेमुक्त करावे, अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आपण स्वत:ला पृथ्वीचे मालक समजायला लागलोय…; उद्धव ठाकरेंचा सर्वपक्षीय नेतेमंडळींना टोला!

अनिल देशमुखांना सत्र न्यायालयाचे समन्स जारी, भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश