in

नांदेडमध्ये वृक्षारोपण मोहीम कागदावरच…RTI कार्यकर्त्याने केली पोलखोल

नांदेडमध्ये वृक्षारोपण मोहीम कागदावरच राबवली जात असल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्त्याने केलीय. या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण देखील केलं. मात्र भोकर तालुक्यातील या भ्रष्टाचाराकडे कुणीही लक्ष दिलेल नाही.

भोकर तालुक्यात झाडे लावण्यासाठी केवळ खड्डे खोदून ठेवण्यात आलेत तर लागवडीसाठी आलेली रोपटे फेकून दिल्याचा प्रताप इथे करण्यात आलाय. त्यामुळे भोकर तालुक्यात वृक्ष लागवड निव्वळ देखावा असल्याचे चित्र आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे.

सामाजिक वनीकरण विभागाचा हा भ्रष्टाचार आता चव्हाट्यावर आला असून जिल्ह्याभरात चर्चेचा विषय बनलाय. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ वनीकरण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भंडाऱ्यात 612.4 मिमी पाऊस, रोवणीला वेग

लोकशाही इम्पॅक्ट | पूरबाधितांना तत्काळ मदत; ग्रंथालयांसाठी ५० लाखांचा निधी