in

‘भारतीय 15 लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; कधी कधी तुम्हीही थोडी वाट पाहा’

यास चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी, राज्यपाल जयदीप धनखर यांना ताटकळत ठेवल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली. यावरून भाजपा नेत्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली आहे. भाजपाकडून ममतांवर हल्लाबोल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे.

“भारतीय 15 लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; तुम्हीही थोडी वाट पाहा” असं म्हणत मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. महुआ मोईत्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. “30 उशीर झाल्याच्या कथित विलंबावरून इतका गोंधळ? भारतीय 15 लाख रुपयांची सात वर्षांपासून वाट पाहत आहेत. लोक एटीएमबाहेर तासन् तास वाट बघत आहेत. लसीसाठी अनेक महिन्यांपासून वाट बघावी लागत आहेत. कधी कधी थोडी प्रतीक्षा तुम्हीही करा” असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकार आणि भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

धक्कादायक !आईनेच पोटच्या मुलांना दगड खानीत फेकले

IPL 2021| IPL बाबत आज मोठा निर्णय होणार