in ,

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद

देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि. 13 जानेवारी) गुरुवारी रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. (PM Modi Meeting Chief Minister) हा संवाद दुपारी 4:30 वाजता होणार (Corona Situation In India) असून तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधानांनी 9 जानेवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातील कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एका बैठक घेतली होती. त्या आढावा बैठकीदरम्यान, मोदींनी जिल्हा स्तरावर आरोग्याच्या पुरेशा पायाभूत सुविधांची खात्री करण्याच्या गरजेवर भर दिला होता. त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत राज्यांशी समन्वय राखण्यास सांगितले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संसदेत कोरोनाचा स्फोट; ७१८ कर्मचारी पॉझिटिव्ह

धक्कादायक ! हॉस्पिटलच्या चेंबरमध्ये आढळले अर्भकाचे हाडे व कवट्या