in

रोग भेदभाव करत नाही तर लसही भेदभाव करणार नाही – नरेंद्र मोदी

देशानं कोरोना लसीकरणात एक महत्वाचा टप्पा पार केला. देशानं 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स आणि देशवासियांचे आभार मानले. आज या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता संबोधित करत आहेत. यावेळी देशांन कर्तव्यही निभावलं आणि यशही मिळवलं असे यावेळी सांगण्यात आले आहे.

भारतासाठी गौरवास्पद कामगिरी असून हे यश देशातील 130 कोटी जनतेचं आहे. हे यश साध्य करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या, शास्त्रज्ञ तसेच आंत्रप्रुनर्स यांचं पंतप्रधानांनी आभार मानले होते. 21 ऑक्टोबर 2021 या दिवसाची इतिहासात नोंद केली जाईल असंही पंतप्रधानांनी म्हटलं होतं.

“आज अनेक लोकं अन्य देशांशी या लसीकरणाची तुलना करत आहेत. जगातील अन्य देशांसाठी लसीवर रिचर्च करणं, ते शोधणं यात ते एक्सपर्ट होते. आपण अनेक लसी बाहेरून मागवत होतो. जेव्हा १०० वर्षांमधील मोठी महासाथ आली तेव्हा भारतावर प्रश्न उपस्थित करण्य़ात आले. भारत लसी कुठून आणणार, पैसे कसे उभारणा, महासाथीला आळा घालण्यासाठी भारत प्रयत्न करू शकेल का असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. हे १०० कोटी लसींचे डोस त्याचं उदाहरण देत आहे. आज भारतानं १०० कोटी डोस मोफत दिले आहे. आज जग भारताला कोरोनापासून भारताला सर्वात सुरक्षित मानेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. आज जग भारताची ताकद पाहत आहे असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • रोग भेदभाव करत नाही तर लसही भेदभाव करणार नाही
  • देशांन कर्तव्यही निभावलं आणि यशही मिळवलं
  • कोणताही भेदभाव न करता विक्रमी लसीकरण
  • थाळी वाजवल्याने जगाला भारताची एकता दिसली
  • VIP कल्चरचा शिरकाव लसीकरणात करू दिला नाही
  • हा देशाच्या इतिहासाचा नवा अध्याय आहे
  • नवीन भारताचं संपूर्ण जगाला दर्शन होत आहे
  • आज पूर्ण जग भारताची शक्ती पाहत आहे
  • लसीकरण मोहीम राबवताना विज्ञानाची कास सोडली नाही
  • आज मेड इंडियाची ताकद मोठी आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तर नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना शंभर टक्के प्रेक्षक क्षमतेची परवानगी

धानाच्या पुंजन्यला आग, आगीत संपूर्ण धान जळून खाक