in ,

भारतात डिजिटल क्रांतीचं नवं पर्व

भारतीय अर्थव्यवस्था डिजिटल क्रांतीकडे आणखी एक पाऊल पुढे टाकते आहे .उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल व्यवहारासाठी उपयोगी ठरणाऱ्या e-rupi चा शुभारंभ करणार आहेत. ई -रुपी हे आर्थिक व्यवहारांचे कॅश्लेस आणि कॉन्टॅक्टलेस माध्यम आहे.

डिजिटल क्रांतीच्या दृष्टीने केंद्र सरकारने गेल्या काही वर्षात अनेक योजना राबवल्या आहेत.कॅशलेस व्यवहारांमुळे इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास अधिक मदत होते.त्या दृष्टीने केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकलं असून ई -रुपी मुळे ‘इलेक्ट्रॉनिक व्हाऊचर’ चा विचार पुढे येतोय.

काय आहे e-RUPI

ई -रुपी हे आर्थिक व्यवहारांचे कॅशलेस माध्यम आहे.लोकांना आपले आर्थिक व्यवहार क्यूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंग आधारे करता येऊ शकतात.नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या यूपीआय प्लॅटफॉर्मवर e-RUPI या सेवेची सुरुवात केली आहे.

e-RUPI वापर हा केंद्र सरकारच्या अनेक योजनांसाठी केला जाऊ शकतो. त्यामध्ये आरोग्य विभागाच्या अनेक योजना आहेत, लाभार्थ्यांना अनुदान देण्याच्या योजना आहेत तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचारीही याचा वापर करु शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून e-RUPI चा शुभारंभ करणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड’चं नवं पाऊल… ४४० कोटींची शेअर विक्री!

सांगलीच्या पलूस तालुक्यातील दुधोंडीत तिघांचा खून, दोन गटात राडा