in

पंतप्रधान मोदी सुरक्षा त्रुटी प्रकरण; ‘या’ संघटनेनं स्वीकारली जबाबदारी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील सुरक्षेच्या त्रुटी प्रकरणात भाजप-कॉग्रेसमध्ये चांगलेच तापल होते. केंद्र सरकार पंजाब सरकारवर आरोप करत होते, तर पंजाब सरकार हे आरोप फेटाळत होते. आता या प्रकरणाला वळण मिळाले आहे. शिख फॉर जस्टीस (Sikh For Justice) या खलिस्तान समर्थक संघटनेने त्या घटनेची जबाबदारी स्विकारली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याचा प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्ती न्यायाधीशांच्या नेतृत्वात स्वतंत्र चौकशी समिती नेमली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या काही वकिलांनी त्यांना युनायटेड किंग्डममधून धमकीचे कॉल आल्याचा आरोप केला आहे. हे रेकॉर्डेड कॉल असल्याचंही या वकिलांनी सांगितलं. या कॉलमध्ये पंजाबमधील मोदींच्या वाहतूक कोंडीची जबाबदारी आमची असल्याचा दावा शिख फॉर जस्टीस या खलिस्तान समर्थक संघटनेने केला आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये काय ?

ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे, “सर्वोच्च न्यायालय मोदींच्या सुरक्षेवर सुनावणी घेत आहे. पंजाबच्या शिख शेतकऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करू नका आणि मोदी सरकारला मदत करू नका. शिख फॉर जस्टीस (SFJ) मोदींचा ताफा फिरोझपूरमध्ये अडवण्यास जबाबदार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी १९८४ चं हत्याकांड आठवावं. तुम्ही एकाही हत्याऱ्याला पकडू शकत नाही. जर सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला मदत केली तर ते त्यांचं सर्वात वाईट काम असेन.”

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Nude Photography | न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन; तरुणाला आली आंदोलनाची धमकी

Maharashtra Corona | महाराष्ट्रात 33 हजार 470 नवे रुग्ण