in

मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल; पंतप्रधान मोदींनी केलं टि्वट

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनमोहन सिंग यांनी तापानंतर थकवा जाणवत असल्याची तक्रार केल्यानंतर बुधवारी सायंकाळी त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्यासाठी ट्वीट केलं असून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

नरेंद्र मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, मनमोहन सिंग यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.

मनमोहन सिंग यांना एम्सच्या ह्रदय-मज्जाविज्ञान (कार्डिओन्युरो) विभागात दाखल करण्यात आलं आहे. अनेक वर्षांपासून सिंग यांचे फिजिशियन असलेले डॉक्टर नितीश नाईक यांच्या नेतृत्वाखालील ह्रदयरोगतज्ज्ञांचा एक चमू त्यांच्यावर देखरेख ठेवून आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

काय खास आहे ‘गोदावरी’ या सिनेमाच्या नावात; जाणून घ्या जितेंद्र जोशी काय म्हणतात

‘रावणाला मदत करणारी शूर्पणखा नको’; वाघ यांचा चाकणकरांना टोला