देशभरात शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवरायांवरील भाषणाचा एक आपला जुना व्हिडीओ शेअर केला आहे. दुसरे ‘शिवाजी’ महाराज कोणी होऊ शकत नाही पण ‘सेवाजी’ मात्र होऊ शकतो असं सांगत सेवेचे महत्व व्हिडिओच्या माध्यमातून अधोरेखित केले आहे. त्याच प्रमाणे राहुल गांधीनी सुद्धा शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात म्हटले की, भारत मातेचे सुपुत्र छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त नमन. त्यांचे साहस, अद्भुत शौर्य आणि असाधारण बुद्धीमत्ता अनेक युगे देशवासियांना प्रेरित करतील.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शौर्य, साहस आणि पराक्रमाचे प्रतिक असलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा असे राहुल गांधींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Comments
Loading…