in

जबरदस्त फीचर्सह ‘हा’ स्मार्टफोन लवकरच होणार लाँच

Poco C सीरिजमधील Poco C4 हा फोन 30 सप्टेंबरला लाँच होणार आहे.याचा टीझर कंपनीने गुरुवारी सोशल मीडियावर लाँच केला. या टीझर फोटोमध्ये या फोनचा लूक पाहून युजर्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

याबाबत माहिती गॅजेट्स डॉट एनडीटीव्ही डॉटकॉमने दिली आहे. Poco C3 हा रेडमी 9सी सारखाच होता ज्यात मागच्या बाजूला तीन कॅमेरा होते. वॉटरड्रॉप पद्धतीचा डिस्प्ले नॉच होता. पोको इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून Poco C4 चा टीझर गुरुवारी लाँच करण्यात आला. हा फोन प्रत्यक्ष 30 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता बाजारात लाँच होईल असं या टीझरमध्ये म्हटलं आहे.

शाओमीच्या या स्पिन-ऑफ ब्रँडने टीझर पोस्ट केल्यानंतर फॉलोअर्सनी Poco C4 कधी लाँच होऊ शकतो अशा प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात कंपनीने लाँच केलेल्या Poco C3 या फोनचं हे पुढचं व्हर्जन असू शकतं. Poco C3 हा सर्वांत परवडणारा फोन होता.दरम्यान, कंपनीने प्रसिद्ध केलेल्या टीझरमध्ये Poco C4 बद्दल कुठलेही स्पेसिफिक डिटेल्स दिलेले नाहीत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सलमानचा आगामी चित्रपट ‘अंतिम’ च्या रिलीजसंदर्भात मोठी अपडेट

पालघर जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ; कुपोषित बालकांची संख्या 3049 वर