in

Poco C4 स्मार्टफोन भारतात या तारखेला होणार लॉन्च

बाजारामध्ये रोज नवं नवीन स्मार्टफोन लॉन्च होत असतात. असाच एक दमदार स्मार्टफोन pocoया कंपनीने लॉन्च केला आहे. पोको सी सीरिजमधला Poco C4 हा फोन 30 सप्टेंबरला लाँच होणार आहे.

कंपनीने याचा टीझर गुरुवारी सोशल मीडियावर लाँच केला. या टीझर फोटोमध्ये या फोनचा लूक पाहून युजर्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याबबातचं वृत्त गॅजेट्स डॉट एनडीटीव्ही डॉटकॉमने दिलं आहे. महागडा iPhone Switch Off किंवा चोरी झाला तरी करता येणार ट्रॅक,IOS 15चं खास फीचर Poco C4 मॉडेलची किंमत अजून जाहीर झालेली नसली तरीही तो गेल्यावर्षी कंपनीने लाँच केलेल्या Poco C3 चं पुढचं व्हर्जन आहे असं वाटतंय.

Poco C3 हा रेडमी 9सी सारखाच होता ज्यात मागच्या बाजूला तीन कॅमेरा (Three Cameras) होते. वॉटरड्रॉप पद्धतीचा डिस्प्ले नॉच होता. पोको इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून Poco C4 चा टीझर गुरुवारी लाँच करण्यात आला. हा फोन प्रत्यक्ष 30 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता बाजारात लाँच होईल असं या टीझरमध्ये म्हटलं आहे.

शाओमीच्या या स्पिन-ऑफ ब्रँडने टीझर पोस्ट केल्याकेल्या फॉलोअर्सनी Poco C4 कधी लाँच होऊ शकतो याचा कयास मांडणाऱ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात कंपनीने लाँच केलेल्या Poco C3 या फोनचं हे पुढचं व्हर्जन असू शकतं. Poco C3 हा सर्वांत परवडणारा फोन होता. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या टीझरमध्ये Poco C4 बद्दल कुठलेही स्पेसिफिक डिटेल्स दिलेले नाहीत.

त्यांनी केवळ ‘C U Soon’ इतकंच लिहिलंय. म्हणजे त्यांना जणू सुचवायचं आहे की Poco C सीरिजमधलं नवं मॉडेल लवकरच बाजारात दाखल होत आहे. Poco C3 ची या वर्षी जानेवारीपर्यंत भारतात 1 मिलियन युनिट विकली गेली असून ऑगस्ट 2021 पर्यंत ही संख्या 2 मिलियन झाली होती. सध्या 3GB RAM + 32GB स्टोरेज असणारा Poco C3 फोन 7 हजार 349 रुपयांमध्ये उपलब्ध असून 4GB RAM + 64GB स्टोरेजचा मोबाईल 8 हजार 349 रुपयांना उपलब्ध आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बिबी का मकबऱ्यासमोर उत्खननात सापडले स्नानगृह

कपिल शर्माच्या विरोधात मध्यप्रदेशमध्ये एफआयआर दाखल