in

पोहरादेवी गर्दी प्रकरण; चौकशी अहवाल आल्यावर कारवाई होईल – नवाब मलिक

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेले वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या पोहरादेवी येथे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर समर्थकांची गर्दी जमली होती. त्यामुळे कोरोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन झाले होते. या घटनेनंतर राजकारण चांगलेच तापले होते. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आता चौकशीचे आदेश दिल्यानंतर अहवाल आल्यावर कारवाईचे होईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपानंतर काही दिवस गायब असलेले संजय राठोड पोहरादेवी येथे आले होते. याचं स्थानी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी पोहरादेवी येथे नागरिकांनी मोठी गर्दी करून सोशल डीस्टन्सिंगचा फंजा उडवला होता. यावर पोहरादेवी येथे गर्दी करू नये, असे आवाहन केले होते. कोरोनाबाबत सर्वांनी गंभीर असणे आवश्यक आहे. नागरिक स्वयंस्फूर्तीने आले, असा दावा राठोड यांनी केला.

दरम्यान विरोधकांकडून या प्रकारावर सत्ताधारी महाविकास आघाडीला टार्गेट करण्यात येत आहे. यावर आता नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पोहोरादेवीला गर्दी जमण्याचे कारण काय ? कोणत्या नेत्यांनी आवाहन केलं होतं ? राजकीय पक्षाने दिलं होतं का? याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना अशी गर्दी जमते, त्यावर निश्चित अहवाल आल्यावर कारवाई होईल असे नवाब मलिक यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इतर वस्तू विकणारे रडारवर, ‘आरे’च्या सर्व स्टॉल्सचे होणार सर्वेक्षण

रत्नागिरीचा आंबा पोहोचला लंडनला, पेटीला मिळला 5 हजार भाव