in

धक्कादायक : पुण्यात घरफोड्या करणाऱ्या आरोपीस अटक, 15 गुन्हे उघडकीस

खानावळीच्या माध्यमातून घरोघरी डबे पोच करण्याचे निमित्ताने रेकी करून घरफोड्या करणाऱ्या एका सराईत घरफोड्याला गुन्हे शाखेच्या युनिट 6 अटक केलीय. आकाश उमाप असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत होणाऱ्या घरफोड्याचा तपास गुन्हे शाखा युनिट 6 चे अधिकारी व कर्मचारी करत होते. पोलीस नाईक नितीन मुंडे यांना हडपसर येथील घरफोडीचा गुन्हा एका आचाऱ्याने केला असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांनी आचारी आकाश उमाप याला अटक करून त्याला न्यायालयात हजर करत पोलिस कोठडी घेतली. पोलीस कोठडी दरम्यान त्याच्याकडे सुरुवातीला केलेल्या चौकशीत त्यांनी “मी स्वतः आचारी असून लोकांना डबे पुरवण्याचे काम करतो, तुम्हाला माझ्या बाबत चुकीची माहिती मिळाली आहे असे सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी हडपसर मधील साथीदारांसह घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्रात ४७ वेळा कोरोनाने बदलला रंग!

अकोल्यात चॉकलेट वाटप करून शिवसेनेने केला पेट्रोल- डिझेल दरवाढीचा निषेध