लोकशाही न्यूज नेटवर्क
खारघर पोलिस स्टेशनचे पोलिस हवलदार संतोष पाटील यांनी दीर्घ आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सोमवारी मध्यरात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलीस आत्महत्या प्रकरणामध्ये वाढ होत असून यापूर्वी APMC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी सरकारी रिव्हॉल्व्हरमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पोलीस ठाण्यातच पवार यांनी स्वत:वर गोळी झाडली. तर आता दीर्घ आजारपणाला कंटाळून खारघर पोलिस स्टेशनचे पोलिस हवलदार संतोष पाटील यांनी आत्महत्या केली आहे .
Comments
Loading…