in

म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शनच्या काळाबाजाराचा पोलिसांनी केला पर्दाफाश

रेमडिसिविरनंतर आता म्युकर मायकोसिस आजारावर वरदान ठरणाऱ्या अँफोटेरिसीन इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाला आहे. या काळाबाजाराचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पारिचरिकेसह पाच जणांना अँटी गुंडा स्कॉडने बेड्या ठोकल्या आहेत. मात्र मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे.

डमी ग्राहक बनून पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी या टोळीशी साधलेल्या संवादाची ऑडिओ क्लिप देखील हाती लागली आहे. परिचारिका ममता जळीत ही मोशी कोव्हीड सेंटरमध्ये परिचारिका म्हणून काम पाहते. तिने सोलापूरमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करणाऱ्या मित्राकडून हे इंजेक्शन मागविले. त्यानुसार अँफोटेरिसीनच्या एका इंजेक्शनला 21 हजार तर बेवासीझुमॅब इंजेक्शनची 65 हजार रुपये दर ठरला. त्यानुसार अँटी गुंडा स्कॉडने सापळा रचून पारिचरिकेसहपाच आरोपींना बेड्या ठोकल्या. मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असल्याचं पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona: महाराष्ट्रात 10 हजार 891 कोरोनाबाधित; रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर

रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसामुळे कर्फ्यु लावणार