in ,

गोवंडीतून पोलिसांनी केले ड्रग्स जप्त

नालासोपारा येथून गोवंडीत कोकेन आणि एमडी ड्रग्ज विकायला आलेल्या एका नायजेरियन तस्कराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने रंगेहाथ पकडले.

एक नायजेरियन ड्रग्ज तस्कर कोकेन आणि एमडी विकायला गोवंडी परिसरात येणार असल्याची खबर घाटकोपर युनिटला मिळाली होती. त्यानुसार पथकाने बैंगनवाडी परिसरात सापळा लावला. ड्रग्ज तस्कर तेथे आल्याचे खबऱ्याने सांगताच पोलिसांनी केनेथ ओकेके या नायजेरियन तस्कराला पकडले. त्याच्या अंगझडतीत 20 लाखांचे एमडी आणि 15 लाखांचे कोकेन सापडले.एकूण 35 लाखाचे ड्रग्स पोलीसांनी जप्त केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्यासंदर्भात उदय सामंत यांनी दिली ही महत्त्वाची माहिती

Sameer Wankhade | एनसीबीच्या समीर वानखेडेंवर पाळत; धनंजय मुंडे म्हणाले…