in

पूजा चव्हाण प्रकरण; फडणवीस, मुनगंटीवार, चित्रा वाघ यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी मृतक मुलीच्या कुटुंबियांच्या बदनामीसह बंजारा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी वाशिम जिल्ह्यातील मनोरा पोलीस ठाण्यात भाजपच्या दिग्गज नेत्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रीय बंजारा परिषदचे युवा जिल्हा अध्यक्ष श्याम राठोड यांनी भाजपच्या दिग्गज नेत्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले, या प्रकरणात पूजा चव्हाण या मुलीची बदनामी झालीच. पण तिच्या परिवाराची आणि संपूर्ण बंजारा समाजाचीही बदनामी झाली. पीडितेने आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

तसेच तक्रारीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार अतुल भातखळकर, भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार आशिष शेलार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रसाद लाड आदि नेत्यांची नाव घेत, पोलीस स्टेशनमध्ये जात पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकला आणि तपासात अडथळा निर्माण केला. तसंच कोर्टाच्या निर्णयाची पायमल्ली करत एका स्त्रीची संपूर्ण भारतात जाणून बुजून बदनामी केल्याचा आरोप केला. बंजारा परिषदेने केलेल्या या तक्रारीनुसार मनोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिक्षण संस्थांना कोर्टाचा दणका; अतिरिक्त शुल्क घेण्यास मज्जाव

Mukesh Ambani | आरोपींच्या शोधासाठी आतापर्यंत 700 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी