in

pooja chavan suicide case: पुजाचा पोस्ट मार्टम अहवाल आला समोर; महत्त्वाचे जबाबही नोंदवले

लोकशाही न्यूज नेटवर्क

पुण्याच्या वानवडीत इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केलेल्या पूजा चव्हाणचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये डोक्याला आणि मणक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. पुजाचा भाऊ आणि तिच्या मित्राने दिलेल्या जबाबावरून तिने मद्यपान केल्याचे समोर आले आहे.

पूजा चव्हाण ही मूळची बीडची आहे. पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या अभ्यासक्रमासाठी ती आली होती. महंमदवाडी या उच्चभ्रू परिसरात ती वास्तव्यास होती. दरम्यान, ७ फेब्रुवारीला तिने राहत्या इमारतीतून उडी मारली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र या आत्महत्येशी महाविकास आघाडीतील एका मंत्र्याचा संबंध जोडल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.

या प्रकरणात लोकशाही न्यूजच्या हाती काही ऑडिओ रेकॉर्डिंग्ज आले होते. यामध्ये पुजाच्या मृत्यू प्रकरणी बातचीत झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याच प्रमाणे या आत्महत्येशी संबंधित काही महत्वाची माहिती दडवण्यात येत असल्याचे देखील संभाषणात समोर आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Lokशाही Impact : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची होणार सखोल चौकशी, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

विनाअनुदानित शिक्षकांना ‘अच्छे दिन’ कधी येणार? आझाद मैदानावरील आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष