in ,

Pooja death Case | चित्रा वाघ तुम्हाला पुरुन उरेन; सरकावर हल्लाबोल

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा चव्हाण यांनी शिवसेनचे नेते आणि वनमंत्री संजय चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सरकार, पोलीस बलात्काऱ्यांना वाचवत असल्याची घणाघाती टीका केली.

“आज आम्ही जर पुजाच्या न्यायासाठी जर उभा राहिलो नाही, तर आम्ही सावित्रीच्या लेकी म्हणून घेण्यास समर्थ नाही. पुरोगामी महाराष्ट्र सगळं बघतोय मुख्यमंत्री साहेब आम्ही आवाज उठवला तर आमच्यावरच केसेस? पण केसेस दाखल जरी झाल्या तरी आम्ही प्रश्न विचारतच राहू, ही चित्रा वाघ तुम्हाला पुरुन उरेन”, असंही त्या म्हणाल्या.

पूजा चव्हाण प्रकरणावरून भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. संजय राठोड बलात्कारी असून, एका बलात्काऱ्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. व्याभिचाराचं उदात्तीकरण सुरू आहे. पण, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षा आहेत.

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांची नाशिक येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून राज्य सरकार आणि पोलिसांना काही सवाल उपस्थित केले. “पूजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोडांचे ४५ मिस्ड कॉल आले आहे. तो मोबाईल पोलिसांकडे आहे. त्याबाबत पोलिसांनी काहीही माहिती दिलेली नाही.

साहेब हे सगळे एकजात सारखेच आहेत. आम्हाला फक्त तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुमच्यावर कुणाचा दबाव तर नाही ना?, असं प्रश्न करत आम्ही तुम्हाला ओळखतो. तुमची वेगळी छबी आहे. तुमचं व्यक्तीमत्व सगळ्यांच्यापेक्षा वेगळं आहे. तुम्ही कारवाई कराल. या बलात्काऱ्याला हाकलून लावाल. याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कराल. आता आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे”, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

मुख्यमंत्री महोदय, या बलात्काऱ्याला हालकून द्या

“मुख्यमंत्री महोदय, या बलात्काऱ्याला हालकून द्या आणि दाखवून द्या महाराष्ट्राला… या राज्यात लेकी बाळांच्या अब्रुला हात घालाल तर तुमची गय करणार नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्या. तसंच राजीनामा घेईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आम्ही तोपर्यंत लढत राहणार, आणि बोलतच राहणार”, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनामुळे अंगारकी चतुर्थीला दगडूशेठ हलवाई मंदिर बंद!

पुण्यात कचरा रॅम्पला भीषण आग