in

Powai Fire : पवईत कार सर्व्हिस सेंटरला भीषण आग

पवईच्या साकी विहार रोडवर लार्सन अँड टब्रो कंपनीच्या समोर साई ऑटो ह्युंदाईच्या सर्व्हिस सेंटरला काही वेळा पूर्वी भीषण आग लागली आहे. यामुळे बाजूच्या महावीर क्लासिक या इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या, पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. या आगीमुळे आणि नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊन मदत कार्याला उशीर होत आहे. शोरूम मधून मोठं मोठ्या स्फोटाचे आवाज होत आहेत. तर या शोरूममध्ये कोट्यवधींच्या गाड्या असून त्या जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘काही शक्ती गांधींच्या भारताला गोडसेचा भारत करण्याचा प्रयत्न करताहेत’

Delhi Air Pollution : दिल्लीच्या सीमेवर ट्रकला ‘नो एन्ट्री’