गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाऐवजी मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव दिले. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देशाला काय नेता मिळाला आहे, लोक विसरुन जातील, अशी त्यांना भीती आहे, असे म्हणत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
या संदर्भात ट्विटरवर ट्विट करत प्रकाश आंबेडकर यांनी देशाला काय नेता मिळाला आहे? लोक विसरुन जातील याची त्यांना भीती वाटत आहे. यांच्या मृत्यूनंतर लोक लक्षात ठेवतील की विसरतील याची चिंता आहे. यामुळे त्यांनी मृत्यूपूर्वीच स्टेडियमला नावं दिलेय, अशी टीका आंबेडकरांनी मोदी सरकारवर केली आहे.
या प्रकरणी राहुल गांधीनीही मोदींवर टीकास्त्र उभारले आहे. “खरं किती चांगल्या प्रकारे बाहेर येते: राहुल गांधी खरं किती चांगल्या प्रकारे बाहेर येते, नरेंद्र मोदी स्टेडियम, अडानी एंड, रिलायन्स एंड, जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली, असं ट्विट करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.
Comments
Loading…