in ,

डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

राज्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. या पाश्वभूमीवर राज्यात काही पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. राज्यातील अनेक कलाकार आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली असतानाच आता ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोना लागण झाली आहे.

त्यांना उपचारासाठी नागपुरातील हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सात दिवसांपासून त्यांना ताप आणि खोकला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांची RTPCR चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र ताप आणि खोकला कमी होत नसल्याने त्यांनी आज पुन्हा कोरोना चाचणी केली. त्यात ते पॉझिटिव्ह आले आहे, अशी माहिती अनिकेत आमटे यांनी दिली आहे.

डॉ. प्रकाश आमटे यांची रक्त अशा परिस्थितीत पुढील काही दिवस हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प, आनंदवन आणि सोमनाथ प्रकल्प पुढील काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संजय राठोड यांचे शक्तिप्रदर्शन भोवले, पोहरादेवीच्या महंतासह सातजण कोरोना पॉझिटिव्ह

बापरे; मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक